राज्यातील ‘या’ भागांना रेड अलर्ट तर नांदेडमधील नदी, नाल्यांना पूर

हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे, मुंबई, रत्नागिरी या भागांत 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे

weather update rain will subside in maharashtra heavy rainfall imd alert in maharashtra and gujarat

सध्या राज्यातील बऱ्याच भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तसेच पुढील काही तासांत राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे, मुंबई, रत्नागिरी या भागांत 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

 • पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट
  हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस सातारा, कोल्हापूर , सांगली तसेच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे.
 • अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा
  सध्या अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस झाला असून येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
 • लातूर, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
  लातूर, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यातही बऱ्याच दिवसांपासून पावसाचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने रस्ते बंद होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.
 • नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
  गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्यांना पूर येऊन नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तरोडा नाका परिसरातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा :मुंबईत वादळी पाऊस, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी