घरCORONA UPDATEनव्या कोरोनाबाधितांचे संख्येत घट, मात्र व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या केव्हा घटणार?

नव्या कोरोनाबाधितांचे संख्येत घट, मात्र व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या केव्हा घटणार?

Subscribe

राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला हळूहळू उतरती कळा लागली असून, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस आहे. मात्र मुंबईसह राज्यात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हे मृत्यूचे कारण केवळ कोरोना नाही तर रुग्णाला वेळेत बेड, आयसीयू, ऑक्सिजन, औषधे किंवा उपचार न मिळणे हे आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागात आता ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट होताना दिसतेय.

एप्रिल ते मेदरम्यान अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज

मात्र पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. अशातच अनेक रुग्णांना तात्काळ व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. त्यामुळे एप्रिल ते मे महिन्याचा कालावधील अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. दरम्यान व्हेंटिलेटरवरील रुग्णांचे प्रमाण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे. या मागचे कारण म्हणजे अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये मुंबई, ठाण्याच्या तुलनेत कमी व्हेटिलेटर्स उपलब्ध आहेत यात वाढती रुग्णसंख्या पाहता व्हेंटिलेटर्सची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी एखाद्या गंभीर रुग्णास तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यास त्याला आपला जीव गमावावा लागत आहे. अनेक लोक कोरोना लक्षणे दिसतानाही भीतीपोटी कोरोना चाचणी करत नाहीत. परंतु लक्षणे अधिक गंभीर झाल्यास त्या रुग्णाचे शरीर उपचारांना साथ देत नाही. परिणामी अशा रुग्णांना नंतर व्हेंटिलेटर्सची गरज भासतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडूनही लक्षणे दिसल्यास त्वरीत चाचणी करण्याचे आवाहन केले जात आहे. वयोवृद्ध नागरिकांप्रमाणेच आता तरुण वर्गातील अनेक लोकांनाही कोरोनाची गंभीर लक्षणे आढळत आहेत. यात अनेकदा लठ्ठ असणाऱ्या रुग्णास श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक ऑक्सिजनची पातळी खालवणे, हार्टअटॅकमुळे तरुण वर्गातील लोकांचा मृत्यू होत आहे. परिणामी अनेकदा रुग्णास व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे.

- Advertisement -

व्हेंटिलेटर ऑपरेटिंगसाठी अपुरे मनुष्यबळ

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अनेक ग्रामीण रुग्णालयांसह शहरी भागातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स धुळखात पडून असल्याचा घटना समोर आल्या. यात त्या रुग्णालय प्रशासनाकडून व्हेंटिलेटर फिंट आणि ऑपरेटिंगसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याचे कारण समोर आहे. त्यामुळे राज्यात व्हेंटिलेटर्स असूनही ते चालण्यासाठी प्रशिक्षित यंत्रणा नसल्याने गरजू रुग्णास वेळेत व्हेंटिलेटर्स उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर्सअभावी कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले.

ग्रामीण भागात व्हेंटिलेटर्सचा तुटवाडा

बहुतांश रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याचे चित्र आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागातील स्थिती जैसे थेच दिसतेयं. राज्यातील काही प्रमुख शहारांसह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या वाढली आहे. रुग्णालये खचाखच भरली आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने त्यांचा बळी जातोय. तर आयसीयू, ऑक्सिजन,व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांनी व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णालये भटकावे लागत आहे. मुंबई ठाण्याचा विचार केल्यास या ठिकाणी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १.८२ टक्के आहे.

- Advertisement -

म्युकरमायकोसिसचा वाढता धोका

यात पुन्हा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे प्रमाण वाढताना दिसतेय. दरम्यान मधुमेह आणि यापूर्वीच इतर गंभीर आजार असणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेकदा म्युकरमायकोसिसच्या रुग्णास गंभीर लक्षणे दिसल्यास व्हेंटिलेटरची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसमुळे व्हेंटिलेटरची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -