घरमहाराष्ट्र"रिफायनरी ही परप्रांतीय भूमाफियांचे भले करणारी...", विनायक राऊतांचा खळबजनक दावा

“रिफायनरी ही परप्रांतीय भूमाफियांचे भले करणारी…”, विनायक राऊतांचा खळबजनक दावा

Subscribe

मुंबई | “रिफायनरी ही परप्रांतीय भूमाफियांचे भले करणारी आहे. कोकणचे नाही”, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बारसूमध्ये रिफायनरीसाठी (Barsu Refinery) सर्वेक्षण सुरू होते. परंतु, स्थानिकांनी रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करत आंदोलन केले होते. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर बारसूमधील सर्वेक्षण हे पुढील तीन दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच ‘नाणार आणि बारसूतील भूमाफिया (Land Mafia) या दोघांमध्ये रिफायनरीवरून रस्सीखेच सुरू आहे’, गंभीर आरोप विनायक राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

यावेळी विनायक राऊत म्हणाले, “कोकणात २२४ परप्रांतियांनी जमिनी घेतलेल्या आहेत. या मोदी आणि शहा अशी नावे असलेल्या २०-२२ जणांनी जमिनी घेतल्या आहेत. यात अगदी जम्मू-काश्मीरपासूनचे २२४ परप्रांतियांचा समावेश आहेत.  बारसूमध्ये रिफायनरी केल्यामुळे नाणारच्या भूमाफियांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल. यामुळे आता नाणार आणि बारसूतील भूमाफियामध्ये चढाओढ सुरू आहे. हे सत्य आता उघड झाले आहे. ही रिफायनरी परप्रांतीय भूमाफियांचे भले करणारी आहे. कोकणचे नाही. यामुळे भूमाफियांमध्ये आपआपासत जुंपली आहे. काही दिल्लीचे भूमाफिया तर, काही महाराष्ट्रातील भाजपपुरस्कृत भूमाफिया आहेत. म्हणजे तुम्हाला की आम्हाला कोट्यवधी रुपय पाहिजे. यातून आता रिफायनरीसाठी रस्सीखेच सुरू आहे”, असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, “महाराष्ट्रात गुरुवारी १४ कोटी जनतेचे कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदेंना पेटलेले कोकण पाहायला वेळ मिळाला नाही. कदाचित स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवले असावे, आणि मुख्यमंत्र्यांनी खातरजमा देखील केली नाही. बारसूत गुरुवारी ग्रामस्थांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या, पोलिसांनी लाठीजार्ज केला होता. यानंतर काही ग्रामस्थांना रत्नागिरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची आम्ही चौकशी करत आहोत. बारसूत रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर गुरुवारी पोलिसांनी लाठीजार्ज केला नाही आणि आंदोलन करणाऱ्यांवर जबरदस्ती केली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाता हे महाराष्ट्राचे दुर्दैवा आहे”, असे विनायक राऊत म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -