घरमहाराष्ट्ररिफायनरी प्रकल्प रेटून नेणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

रिफायनरी प्रकल्प रेटून नेणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Subscribe

साताराः कोकणातील रिफायनरी प्रकल्प रेटून नेणार नाही. बारसू येथील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिकांच्या संमतीनेच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ॉ

सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही हमी दिली. बारसू येथे केवळ सर्व्हेक्षण सुरु आहे. प्रत्यक्ष प्रकल्प सुरु झालेला नाही. स्थानिकांची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प आम्ही रेटून नेणार नाही. स्थानिकांच्या संमतीनेच हा प्रकल्प होणार आहे. स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला. काहीजणांनी नागरिकांची डोकी भडकवली. नंतर समृद्धी महामार्गाचा विरोध कमी झाला. त्यामुळे नागरिकांना भडकवणारेही लांब झाले. आम्ही महामार्ग पूर्ण केला. तसाच कोकणातील रिफायनरी प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत.

उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पासाठी पत्र दिले होते. आता तेच याला विरोध करत आहेत. चांगल्या कामांना विरोध करणे हा दुप्पटीपणा आहे. विरोधाला विरोध म्हणून विकासाला विरोध करु नका, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना केले.

- Advertisement -

कोकणातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होत आहे. यासाठी तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी राजकीय घमासानही सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर टीका केली आहे. या आंदोलनाची सुपारी घेतली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तर या प्रकल्पाला स्थानिकांची संमती असेल तरच तेथे प्रकल्प करावा, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहिले होते. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या पद्धतीने महिलांवर पोलिसांनी हल्ले केले आहेत. आंदोलकांना फरफटत मारत पोलिसांच्या गाडीत फेकले जात आहे. आतंकवाद्याशी लढाई लढावी अशापद्धतीने आंदोलकांवर बंदूक्या रोखल्या जात आहेत. ही काही लोकशाही नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -