घरमहाराष्ट्ररिफायनरी महाराष्ट्रातच होणार, फडणवीसांचा ठाम निर्धार; पण कुठे?

रिफायनरी महाराष्ट्रातच होणार, फडणवीसांचा ठाम निर्धार; पण कुठे?

Subscribe

रिफायनरी होणारच, ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रातच पूर्ण रिफायनरी करण्याचा प्रयत्न सुरू.

मुंबई – कोकणातील राजापुरात प्रस्तावित असणाऱ्या रिफायनरीला (Refinery in rajapur) प्रचंड विरोध होतोय. स्थानिकांसह शिवसेनेनेही याला विरोध केलाय. परंतु, रिफायनरी महाराष्ट्रात होणारच असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलून दाखवला. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – इलेक्ट्रॉनिक क्लस्टरनंतर राज्यात टेक्सटाईल पार्क उभारणार, फडणवीसांनी दिली इनसाइड माहिती

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. आजपर्यंत देशामध्ये कधीच गुंतवणूक झाली नाही इतकी सेफ गुंतवणूक रिफायनरीमध्ये (Safe Investment in Refinery) आहे. यामुळे ३ लाख कोटीपेक्षा गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. तसंच, १ लाख लोकांना थेट रोजगार, इतर रोजगार मिळणार आहे. पण अशा रिफायनरीला विरोध केला जातोय.


रिफायनरी होणारच, ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रातच पूर्ण रिफायनरी करण्याचा प्रयत्न सुरू. त्यांना महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय? गुंतवणूक परत पाठवून महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं. ही गुंतवणूक जात असताना कुठलेही एचएमव्ही पत्रकार बोलले नाही. साधं ट्विटदेखील केला नाही. महाराष्ट्राप्रती आताची जी संवदेना दिसते ती तेव्हा कुठे गहाण होते हे माहित नाही, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

रिफायनर प्रकल्प आम्ही करणारच. तो नाणारमध्ये की म्हापसूळ माहिती नाही. यात काही गावं वगळणार, काही गावं घेणार आहोत, असंही फडणवीस म्हणाले. तसंच, नाणार रद्द केल्याची अद्यापही घोषणा आम्ही केलेली नाही. रिफायनरी महाराष्ट्रातच होणार. नाणारचा भाग त्यातून काढणार अशी ती घोषणा होती, असंही स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -