घरदेश-विदेश'सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या!',खुद्द पंतप्रधान मोदींच्या भावाचे व्यापाऱ्यांना आवाहन

‘सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या!’,खुद्द पंतप्रधान मोदींच्या भावाचे व्यापाऱ्यांना आवाहन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ आणि ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी शुक्रवारी व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत जीएसटी न भरण्यास सांगितले. प्रल्हाद मोदींनी व्यापाऱ्यांना महाराष्ट्र सरकार आणि केंद्रापर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी या मुद्यावर आंदोलन सुरू करण्याचा सल्ला देखील दिला. मागील दोन वर्षात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अशात सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नसल्याने आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेने प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केले होते.

उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी असे म्हटले, रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केलं.

- Advertisement -

तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधायचे असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग पहा, उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी केले. यावेळी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, यानंतर आम्ही जीएसटी केंद्राला भरतो, त्यामुळे आम्ही केंद्रालाच जाब विचारणार. कोरोना माहामारीदरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल उल्हासनगरात अनेक व्यापाऱ्यांवर पँडेमिक ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे महाराष्ट्रातही हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -