घरमहाराष्ट्रपुणेमराठा आरक्षण आणि शरद पवार-अजित पवार भेटसंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले...

मराठा आरक्षण आणि शरद पवार-अजित पवार भेटसंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले…

Subscribe

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण केले होते. यानंतर मराठा समाजांच्या कुणबी नोंदणी शोधण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदणी आढळून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. राज्य सरकार मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहेत.

तसेच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरून ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. यात राज्याचे मंत्री छनग भुगन भुजबळ आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट विरोध केला आहे. यामुळे राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सूचक विधान केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला डेंग्यूची लागण, सोशल मीडियावरून दिली माहिती

मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात मराठा समाज आणि साडे तीन कोटी लोकसंख्या असलेला समाज आहे. यातही सात कोटी समाजातील लोकांच्या मनात एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. यामुळे सर्व समाजाच्या नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. समात तेढ निर्माण करणे हे आपले कान नाही. आपल्या राज्यात संत महतांनी जी सामाजिक वीण गुंफली आहे. ती तोडणे किंवा जोडण्याचे काम करू नये. मराठा समाजाला तीन टप्प्यात आरक्षण मिळण्याची प्रोसेस सुरू आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांनी केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाकडून आंदोलन

पवारांच्या डोक्यात काय सुरू

संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीतील शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी जाऊन दिवाळी साजरा करतात. यंदा अजित पवारांनी बंड केल्यानंतर गोविंदबागमध्ये दिवाळीला जाणार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण रात्री उशिरा अजित पवार हे दिवाळी साजरा करण्यासाठी गोविंदबागेत गेले होते. यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, “पवार कुटुंबात कितीही मतभेद असले तरी ते सणासुदीला एकत्र येतात हेच त्यांच्या कुटुंबाचे वैशिष्ट आहे. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले म्हणून मतभेद विसरले असे होत नाही. त्या दोघांमध्ये अजूनही मतभेद आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे. हे घटना घडल्याशिवाय कळत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -