पुणे : मी विकासाचा विचार करतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार हे 23, 24, 25 या तीन दिवसीय दौऱ्याचा आजचा शेवटाचा दिवस आहे. यावेळी 2024 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे याच्या उमेदवारीसंदर्भात मोठे विधान केले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाहांचा मुंबई दौऱ्यावर आले असताना अजित पवार अनुपस्थित राहला होता, या प्रश्नावर अजित पवार स्पष्टीकरण ते म्हणाले, “मी 23,24,25 तीन दिवसांचा माझा दौरा ठरलेला होता. अमित शाहा हे मुंबईतील काही गणपतींचे दर्शन घेण्याकरिता येणार होते. अमित शाहांचा कार्यक्रम मला पण आला होता. यानंतर मी अमित शाहांच्या कार्यलयाला फोन करून मी निरोप दिला की, माझा तीन दिवसांचा कार्यक्रम ठरलेला आहे. पण अमित शाहा हे मुंबईत येत आहेत. अमित शाहांच्या कार्यालयातून सांगितले की, ते गणपती बाप्पाच्या दर्शनानिमित्त मुंबईत येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , आशिष शेलार अशा काही मान्यवरांच्या घरी अमित शाहा जाणार होते आणि लालबागचा राजाच्या दर्शना देखील ते जाणार होते. यामुळे तुमचे पहिले ठरलेले कार्यक्रम ते केले तरी काही हरकत नाही, असा निरोप आला होता. यानंतर मी माझे कार्यक्रम केले.”
हेही वाचा – व्याख्यान द्यायला आले, पण शेवटी आख्यान झाले, ठाकरे गटाचे अमित शहांवर जोरदार टीकास्त्र
सुप्रिया सुळेंच्या उमेदवारी म्हणाले…
दोन गट पडले असताना बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे उमेदवार कशा, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “ते बोललेत तर तुम्ही मला कसे काय विचारता, असा उलट प्रश्न अजित पवार यांनी केला. मला पहिल्यांदा त्यांना विचारावे लागेल की, ते असे बोललेत का?कारण मी दौऱ्यावर असल्यामुळे कोण काय बोलेत हे ऐकले नाही.”
हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी; वेळापत्रक समोर येण्याची शक्यता
मुस्लीम आरक्षणासंदर्भात बैठक
मुस्लीम समाजाला शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुम्ही काही दिवसांपूर्वीची बातमी वाचलेली नाही. तुम्ही काही दिवसांपूर्वीची बातमी वाचली नाही. मी उपमुख्यमंत्री म्हणून अल्पसंख्या मंत्री अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, वक्फ बोर्डाचे सीईओ, डिपार्डमेंटचे सक्रेटरी, या सर्वांची बैठक घेतली होती. मौलाना आझाद मंडळात काय केले पाहिजे. इतरबाबतीत काय केले पाहिजे. वक्फ बोर्डाच्या जमिनीबद्दल काय केले पाहिजे, यावर बरीच चर्चा झाली. आज तोही वर्ग आपल्या देशात आणि राज्यात आहे. काम करत असताना सगळ्यांचा विचार करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शन डोळ्यासमोर ठेवून. मी काम करत असतो आणि शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचार धारा त्या रस्त्यांनी मी पुढे जात असतो. माग आरक्षण दिले असताना न्यायालयाने शिक्षणाचे आरक्षण मान्य केले होते. पण नोकरीचे मान्य केले नव्हते. सर्वांना शिक्षणाचा अधिकार हा मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला योग्य प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून आपल्या सगळ्याचा प्रयत्न आहे.”