घरताज्या घडामोडीतिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची नोंदणी १ मार्चपासून सुरू होणार - राजेश टोपे

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची नोंदणी १ मार्चपासून सुरू होणार – राजेश टोपे

Subscribe

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार

देशातील कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या मोठ्या मोहिमेला सुरुवात झाली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यातील सव्वा पाच लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात आहे. आता लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. राजेश टोपे म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार असून याची नोंदणी १ मार्च पासून होऊ शकते.

दरम्यान केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकार लसीकरण मोहीम पार पाडत आहे. लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट न झाल्याचा दावा राजेश टोपे यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांना लस घेण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे.

- Advertisement -

कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या माहितीनुसार, सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ४६ हजार २८७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ३२५ जणांचा मृत्यू झाला असून १९ लाख ५८ हजार ९७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३४ हजार ७२० जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत – राजेश टोपे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -