घर महाराष्ट्र पुणे गणेशोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या सराव सुरू; नागरीक त्रस्त

गणेशोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या सराव सुरू; नागरीक त्रस्त

Subscribe

पुणे : गणेशोत्सव जस जसा जवळ येऊ लागला आहे. तशा गणेशोत्सवाच्या लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. लाडक्या बाबाचे स्वागत करण्यासाठी ढोल-ताशा पथक देखील सज्ज झाले आहे. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथक हे आकर्षण राहिले आहे. या सर्व ढोल-ताशा पथकांनी सराव करण्यास देखील सुरुवात केली आहे. पण ढोल-ताशाच्या कर्णकर्कश आवाजांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांच्या कानाला त्रास होऊ लागले असून ढोल-ताशाच्या आवाजाने कानाचे विकाराचा धोका वाढू लागला आहे. यामुळे ढोल-ताशा पथकांना रहिवासी परिसरापासून दूर सराव करण्याचे निर्बंध घालावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

गणेशोत्सवा निमित्ताने ढोल-ताशा पथक हे दररोज सायंकाळी सहा वाजल्यानंतर सराव करतात. पुण्यातील बहुतांश ढोल-ताशा पथक हे भिडे पूल, एम. एम. जोशी पूल, ओंकारेश्वर मंदिराच्या नदीपात्रात आणि रस्त्याच्या कडेला ढोल-ताशा पथक सराव करतात. पण पथकांच्या आवाजाने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पथकांनी त्यांच्या वाद्यांची संख्या कमी ठेवावी. या ढोल-ताशा पथकांनी मोकळ्या जागांवर सराव करावा. तसेच शाळांच्या मैदानांवर होणाऱ्या सरावात मर्यादा असावी, अशी भावना नागरीक व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने STकडून 11 स्थानकांसाठी 35 तात्पुरते थांबे; विशेष 1 हजार 400 जादा गाड्या

बहिरेपण येऊ शकते; तज्ज्ञांचे मत

या ढोल-ताशांच्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडत असून ज्येष्ठांपासून ते लहानांपर्यंतच्या कानातील ऐकण्याच्या नसेवर परिणाम झाल्यास बहिरेपण येऊ शकते, अशी माहिती कान-नाक घसाविकार तज्ज्ञांनी सांगितली आहे.

मिरवणूक वेळेत पार पडण्याचा प्रयत्न

- Advertisement -

नुकतेच पुण्यात अजित पवार यांनी गणेश मंडळासोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पुण्याची यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक ही वेळेवर पार पडण्यासाठी प्रशासन आणि मंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे आणि यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा दुपारी 4.30 वाजात विसर्जन मिरवणुकीत सामील होणार असल्याची माहिती ही अजित पवारांनी माध्यमांना दिली आहे.

हेही वाचा  – पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’

 एसटीचे 11 स्थानकांसह 35 तात्परते थांबा

यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने 11 स्थानकांसह 35 तात्पुरत्या थांबा आणि विशेष 1 हजार 400 जादा एसटी कोकणासाठी रवाना करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे गावाकडे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -