घरमहाराष्ट्ररेखा जरे हत्या प्रकरण- बाळ बोठे तीन महिने कुठे होते ?

रेखा जरे हत्या प्रकरण- बाळ बोठे तीन महिने कुठे होते ?

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिने पोलिसांना चकवा देणारा बोठे होता तरी कुठे? आणि पोलिसांना तो का सापडत नव्हता? असे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत.

बाळ बोठे गेले तीन महिने हैद्राबादमधील बिलालनगर येथे लपून बसला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देत तो महाराष्ट्रातून केव्हा पसार झाला हे कोणाला कळाले कसे नाही? ज्याच्या नावावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे असा आरोपी पोलिसांच्या नजरेतून सहज सुटतो आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडून हैद्राबादमध्ये तीन महिने बिनधास्तपणे राहतो हे सगळंच एखाद्या चित्रपटेच्या कथानकासारखं आहे. बोठे उस्मानिया विद्यापीठात पीएचडी पदवी शिक्षण घेत असताना त्याची ओळख काहीजणांशी झाली होती. यात जर्नादन अकुला चंद्राप्पा या क्रिमिनल लॉयरलचाही समावेश होता.. गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी तो कुप्रसिदध आहे. त्याच दोस्तीची मदत घेत बोठेने हैद्राबाद गाठलं. अत्यंत चलाखीने तो तिथे राहत होता. बी. बी. पाटील या नावाने प्रतिभानगरमध्ये एका हॉटेलच्या १०९ नंबर रुममध्ये त्याच्या राहण्याखाण्याची सोय करण्यात आली होती. पण विशेष म्हणजे ज्या रुममध्ये बोठे मुक्कामाला होता. त्याच्या दरवाज्याला बाहेरून कुलुप लावण्यात आले होते.

- Advertisement -

कोणीही ओळखू नये म्हणून बोठे कधी साडी नेसून तर कधी दाढी वाढवून बाहेर जायचा. अशाच प्रकारे तब्बल तीन महिने तो वेषांतर करत होता. यादरम्यान, पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय हे जाणून घेण्यासाठी बोठे वेगवेगळ्या क्रमांकावरून महेश वसंतराव तनपुरे याला फोन करायचा. यामुळे बोठेचा अत्तापत्ता पोलिसांना लागत नवह्ता. महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, या राज्यांसह सुमारे शंभरपेक्षा अधिक ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबविली. अखेर तीन दिवसांपूर्वी तो हैद्राबादमध्ये असल्याचे पोलिसांना कळाले. पोलीस हैद्राबादमध्ये आल्याची भनक बोठेला लागली. त्यानंतर त्याने आपला ठिकाणा बदलला. पण अखेर आज पहाटे नगर पोलिसांनी बोठेला बेड्या ठोकल्या.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -