घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरच्या विवाहितेचे दहशतवाद्यांशी संबंध? पाक तरुणासोबत पळून गेल्यानंतर 9 महिन्यांनी समोर आले 'असे'

संभाजीनगरच्या विवाहितेचे दहशतवाद्यांशी संबंध? पाक तरुणासोबत पळून गेल्यानंतर 9 महिन्यांनी समोर आले ‘असे’

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाची पत्नी तिच्या वडिलांसोबत 2022 मध्ये सौदी अरेबियाला गेली होती. यावेळी तिची ओळख पाकिस्तानी तरुणाशी झाली आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. यानंतर वर्षभरापूर्वी महिला पाकिस्तानी तरुणासोबत सौदी अरेबियाला पळून गेली. त्यानंतर ती भारतात परतली, मात्र ती देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा मेल पोलिसांना आला आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान, गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून एटीएस महिला व तिच्या कुटुंबियांची कसून चौकशी करत आहे. (Relationship of Sambhajinagars married with terrorists 9 months after eloping with Pak Tarun Asey came to light)

हेही वाचा – अयोध्या राम मंदिर उद्घाटनावेळी…, संजय राऊतांकडून भीती व्यक्त; ‘इंडिया’च्या बैठकीत करणार चर्चा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाचं पेट्रोल पंप आहे. त्याचं मालेगावात राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेसोबत 2011 मध्ये लग्न झालं होतं. दोघं पती-पत्नी गुण्यागोविंदाने राहत होते. दरम्यान, 2022 मध्ये महिला तिच्या वडिलांसोबत सौदी अरेबियाला गेली होती. यावेळी तिची ओळख एका पाकिस्तानी तरुणासोबत झाली.

देश सोडून सौदी अरेबियाला पळून गेली

भारतात परतल्यानंतर महिला पाकिस्तानी तरुणाच्या संपर्कात होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये जवळीक वाढली. यानंतर डिसेंबर 2022 मध्ये महिला देश सोडून तरुणाला भेटण्यासाठी सौदी अरेबियाला पळून गेली. या प्रकरणी महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली. महिलेने जानेवारी 2023 मध्ये पतीला कॉल करून पाकिस्तानी तरुणासोबत लग्न केल्याचे सांगितले. तसेच तरुण तिला करिअरसाठी मदत करणार असल्याची माहिती दिली. याशिवाय दोघांचे फोटोही तिने पतीला पाठवलं होते. मात्र 3 ऑगस्ट रोजी ती महिला भारतात परतली आणि पतीकडे न जाता आपल्या आई-वडिलांकडे गेली.

- Advertisement -

हेही वाचा – Rain Update : ‘या’ तारखेपासून राज्यातील परतीच्या पावसाला सुरुवात, हवामान खात्याची माहिती

महिलेचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय

18 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना संबंधित महिलेच्या बाबतीत एक ईमेल आला. महिलेचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने व्यक्त केला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून एटीएसकडून महिला व कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -