घरमहाराष्ट्रकॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना या आठवड्यात मिळणार घरे!

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना या आठवड्यात मिळणार घरे!

Subscribe

जितेंद्र आव्हाडांचे प्रयत्न सफल, शरद पवारांच्या हस्ते चाव्या देणार

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जगभरात नावाजलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातूनच नव्हे तर बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि अरब देशांमधील कॅन्सरग्रस्त उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. या नातेवाईकांची राहण्याची सोय नसल्याने आणि त्यांना खासगी निवासस्थान परवडत नसल्याने मुंबईतील फुटपाथवर राहावे लागते. तर आता या रुग्णांच्या नातेवाईकांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याच आठवड्यात ही घरे देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

टाटा करणार व्यवस्थापन

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी म्हाडाची ही घरे परळ येथील टाटा रुग्णालयापासून जवळ असणार आहेत. लालबाग परिसरातील या घरांचे व्यवस्थापन टाटा बघणार असून अत्यंत गरजू लोकांनाच ती देण्यात येणार येतील. याविषयी टाटाकडून सध्या घर व्यवस्थापन यावर काम केले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे देणार असल्याचे सांगितले आहे. आव्हाड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. रविवारी अचानक शरद पवार यांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला, कॅन्सर पेशन्टच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याचे काय झाले. मी उत्तर दिले की साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले, उशीर कशाला. मी म्हटले आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत. आव्हाड यांच्या या माहितीमुळे आता या आठवड्यातच टाटा मेमोरियल कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे मिळणार आहेत. ३०० चौरस फूट असलेले १०० फ्लॅट टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यामध्ये लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. म्हाडाच्या या घरांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाकडे सोपवण्यात येतील. पुढील काही दिवसात यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही- आव्हाड

कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपर्‍यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे १०० फ्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या २०० होईल. फ्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ७ दिवसांत झाली. म्हाडाने फ्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाची असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही- आव्हाड

कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपर्‍यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या २०० होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ७ दिवसांत झाली. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाचे असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -