घरमहाराष्ट्रआनंदाची बातमी : सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता, राज्य सरकारचा निर्णय

आनंदाची बातमी : सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता, राज्य सरकारचा निर्णय

Subscribe

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे राज्य सरकारची नोकरभरती झाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपत आलेल्या उमेदवारांना यंदा अर्ज करता येत नाही. अशा उमेदवारांना आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निघणाऱ्या सरळसेवा नोकर भरतीमध्ये अर्ज दाखल करता येणार आहेत.

Government Job मुंबई – महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरीसाठीच्या वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे डिसेंबर २०२३ पर्यंतच्या सर्व शासकीय नोकरभरतीमध्ये उमेदवारांना दोन वर्षांची सूट मिळणार आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे राज्य सरकारची नोकरभरती झाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपत आलेल्या उमेदवारांना यंदा अर्ज करता येत नाही. अशा उमेदवारांना आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निघणाऱ्या सरळसेवा नोकर भरतीमध्ये अर्ज दाखल करता येणार आहेत. या संबंधीचे परिपत्रकर राज्य शासनाने आज जारी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. त्या नोकर भरतीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरेल. खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा यामुळे ३८ एवजी ४० वर्ष होईल. तर मागास प्रवर्गासाठी कमाल वरील वयोमर्यादा ४३ ऐवजी ४५ वर्षे होईल. वयोमर्यादेतील ही सूट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या नोकर भरतीसाठी लागू राहील.

- Advertisement -


प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार, शासकीय सेवेते सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन २५ मार्च २०१६ च्या शासन निर्णायात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्ष) दोन वर्ष इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्ष) देण्यात येत आहे.

शासन निर्णायाच्या दिनांकापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली असल्यास, तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही, अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वयोमर्यादा शिथिलता लागू राहिल. त्यानुसार संबंधि जाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी.
३१ डिसेंबर २०२३ नंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संदर्भाधीन २५ मार्च २०१६ च्या शासन निर्णायात अथवा संबधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -