घरमहाराष्ट्रसोयाबीन उत्पादकांना दिलासा, एक क्विंटला मिळतोय ५ हजारांचा दर

सोयाबीन उत्पादकांना दिलासा, एक क्विंटला मिळतोय ५ हजारांचा दर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किंमती वाढत असल्याने सोयाबिन उत्पादालाही चांगला दर मिळत आहेत. सोयाबीनच्या एक क्विंटलला ५,५०० दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळत आहे.देशात महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन म्हणजे ४५ लाख टन उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात ६१ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात फार कमी उत्पादन घेतले गेले. भारतात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली.

भारत ७० टक्के तेल आयात करतो. भारत ब्राझील आणि अर्जेंटिनामधून तेल आयात करतो. परंतु या देशांमध्ये दुष्काळ पडल्याने तेलाचे उत्पादन घटले. याचा परिणाम तेलाच्या किंमतींवर झाला. देशांतर्गत कच्चा मालाला मागणी वाढल्याने दरही वाढले. त्यामुळे भारतात १५ लीटर खाद्यतेलाच्या डब्ब्याची किंमत गेल्यावर्षीच्या तुलनेत १००० रुपयांनी वाढली. त्यामुळे सोयाबीन तेलाचे प्रतिकिलो दरातही १४५ ते १५० रुपयांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी सोयाबीनचा प्रतिक्विंटल दर ३ हजार होता. परंतु यंदा मागणी वाढल्याने आणि पुठवठा कमी असल्याने प्रतिक्विंटल दर ५,५०० हजारांपर्यंत पोहचला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकांनाही चांगले दर मिळत आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्याच दरवर्षी खरीप हंगामात ६ ते ७ लाख हेक्टर विविध पिकांची लागवड होते. यातील ६१ हजार हेक्टरवर फक्त सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात आता मोठ्याप्रमाणात सोयाबीन पीक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. देशाचा विचार केला असता एकट्या महाराष्ट्रात ४५ लाख टन उत्पादन हे एकट्या सोयाबीनचे घेतले जाते. त्याखालोखाल मध्य प्रदेश राज्याचा नंबर लागतो. मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे ४० टन उत्पादन घेतले जाते. तर राजस्थान, गुजरातमध्ये अत्यंत कमी प्रमाणात सोयाबीन पिकवले जाते. मात्र तेल आयात कमी कमी करण्यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी देशांतर्गत सोयाबीन, सूर्यफूल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे.


 

- Advertisement -

 

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -