घरमहाराष्ट्र'दुष्काळ निवारणासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा'

‘दुष्काळ निवारणासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा’

Subscribe

धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागामध्ये अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात असे आदेश राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. त्याला आता संस्था कशारितीनं प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे.

पावसानं ओढ दिल्यानं राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली अहे. मराठवाडा, विदर्भामध्ये तर परिस्थिती पाहता दुष्काळाची दाहकता लक्षात येते. पाण्यासाठी, चाऱ्यासाठी जनावरांची वणवण वाढली आहे. अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे आता धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागामध्ये अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात असे आदेश राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील पाणीसाठी निम्यावर आला आहे. त्याचा फटका जनावरांना बसत आहे. शेतकऱ्यांवर पशुधन कवडीमोल भावानं विकण्याची वेळ आली आहे. अशा वेळी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. धार्मिक संस्थांचा पैसा हा बँकेत पडून राहतो. त्यामुळे धार्मिक संस्थांनी यातील काही पैसा दुष्काळी भागामध्ये वापरावा असे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. किती चारा छावण्या सुरू कराव्यात, किती गुरे असावीत याचा निर्णय घ्यावा. त्यावर धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवले जाईल असे देखील आयुक्तांनी म्हटले आहे.

वाचा – राज्य सरकारकडून अखेर १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नाही, अन्न नाही, चारा नाही अशा स्थितीमध्ये जगण्याचा संघर्ष वाढला आहे. सरकारनं दुष्काळ तर जाहीर केला पण सर्वाचे डोळे मदतीकडे लागले आहेत. जगण्याचा आणि जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकं करपली आहेत. परतीच्या पावसानं देखील ओढ दिल्यानं उरलेल्या आशा देखील मावळल्या. त्यामुळे धार्मिक संस्थांनी आता पुढे यावे असे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आयुक्तांच्या या आदेशाला संस्था कशारितीनं आणि किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -