घरमहाराष्ट्रविरोधी पक्षनेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न - गृहमंत्री

विरोधी पक्षनेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न – गृहमंत्री

Subscribe

शासकीय कामात हस्तक्षेप केलेला खपवून घेणार नाही; गृहमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना इशारा

मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजपचे इतर नेते पोलीस स्टेशनला पोहचले. यावरुन आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटलांनी दिला.

पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनच्या ५० हजार वाईल्स येत आहेत. त्यासंदर्भात चौकशीसाठी ब्रुक फार्माच्या संचलांकाना पोलिसांनी शनिवारी पोलीस स्टेशनमध्ये बोलवले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि इतर नेते पोहोचले. त्यांनी या व्यक्तीला का आणि कशासाठी बोलावलं असा सवाल केला. पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलीस कोणालाही बोलावू शकतात. त्यादृष्टीकोनातून त्यांना बोलावलं. विरोधी पक्षनेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. येत्या काळात या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा दिलीप वळसे-पाटील यांनी दिला.

- Advertisement -

दिलीप वळसे पाटील यांना जेव्हा शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी विरोधी पत्रनेत्यांवर कारवाई करणार का? या प्रश्नावर गुन्हा दाखल करण्याबाबत माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहे, असं वळसे पाटलांनी उत्तर दिलं. कारवाई करण्याबाबत योग्य ती चौकशी करुन निर्णय घेऊ, असं वळसे-पाटील म्हणाले. हा साठा किंवा कदाचीत यापेक्षा अधिक असू शकतो, अशी शक्यता गृहमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी साठा जप्त करण्यात आलेला नाही, अशी माहिती दिली.

विरोधी पक्षाच्या दबावामुळे नाही तर त्या संचालकांनी दाखवलेल्या पत्रानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल. पुढे बोलताना त्यांनी खासगी किंवा राजकीय पक्ष यांना इंजेक्शन खरेदी करता येत नाही. सरकारला रेमडेसिवीर फक्त देण्याचा अधिकार आहे, असं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी ओएसडी यांनी धमकी दिल्याचं मला माहिती नाही, असं सांगितलं.

- Advertisement -

पोलीस चौकशी करणार

डोकानिया यांना घेऊन प्रवीण दरेकर FDA मंत्र्यांकडे गेले तेथे त्यांनी महाराष्ट्रात इंजेक्शन वितरीत करण्यासाठी परवानगी मागितली. परवानगी दिल्या नंतर FDA ने त्यांना पुरवठा करा असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी पुरवठा करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे यामागे काय उद्देश आहे? कोणासाठी हा साठा येणार होता, याची पोलीस चौकशी करत आहेत, अशी माहिती वळसे-पाटलांनी दिली.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -