ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या टाऊनहॉलचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नूतनीकरण

ठाणे ही सांस्कृतिक व कला नगरी आहे. येथे सतत सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या नगरीचा वेगळा लौकिक आहे. अशा या शहराच्या सांस्कृतिक वैभवात टाऊन हॉलने भर घातली आहे.

ठाणे ही सांस्कृतिक व कला नगरी आहे. येथे सतत सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या नगरीचा वेगळा लौकिक आहे. अशा या शहराच्या सांस्कृतिक वैभवात टाऊन हॉलने भर घातली आहे. या वास्तुचे नूतनिकरण करताना ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम झाल्याचे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे काढले. शहराचे सास्ंकृतिक वैभव असलेल्या टाऊन हॉलचे नुतनीकरण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत या नुतनिकृत टाऊन हॉलचे उद्घाटन आणि ॲम्फी थिएटरचे लोकार्पण आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, निरंजन डावखरे, संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

‘टाऊन हॉलच्या नुतनीकरणाच्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करीत कल्पकता व वास्तूचा ठेवा जपण्याची तळमळ जपणारा अधिकारी असेल तर किती चांगले काम होते हे या निमित्ताने कळते. नेवासा येथून विशेष दगड आणून या हॉलच्या भिंतींचे काम करण्यात आले आहे. जुन्या बांधकामाला आधुनिकतेची जोड देत टाऊन हॉल व ॲम्पिथिएटरच्या रुपाने कलावंतांना एक व्यासपीठ मिळाले आहे’, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

ठाणे हे तलावांचे शहर असून मासुंदा तलाव हे शहराचे भूषण आहे. त्याचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यासारखेच इतर तलावांचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या वारशांचे ऐतिहासिकपण जपले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. अॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ठाणे जिल्ह्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व जपण्यात टाऊन हॉलचा महत्त्वाचा वाटा आहे. ९४ वर्षे झालेल्या या वास्तूला ठाण्याच्या सांस्कृतिक दैनंदिनीत एक वेगळे स्थान आहे. या वास्तूच्या रचनेत बदल न करता याला हेरिजेट लूक दिला आहे.

त्याचबरोबर ॲम्पिथिएटरचे काम करताना येथील वृक्षांची विशेष काळजी घेतली आहे. टाऊन हॉलमधील सभागृहात बाहेरील आवाजाचा त्रास होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कलाकारांना होणाऱ्या गैरसोयी यावेळी दूर करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात कलाकार व मान्यवरांना बोलावून येथे एक सांगितिक कार्यक्रम करण्यात येईल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने याचे लोकार्पण होईल, असे त्यांनी सांगितले.

टाऊन ह़ॉलच्या नूतनीकरणाकामी परिश्रम घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन पाटील सहायक अभियंता रणजित शिंगाडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक योगिराज देवरे, ठेकेदार मोहन पाटील, निवृत्ती पाटोळे यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या टाऊनहॉलचे पुरातन सौंदर्य जपत त्याच्या नूतनीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी नार्वेकर, तहसीलदार तवटे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सामंजस्य करार

नुतनीकरण झालेला टाऊन हॉल ठाणे महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आला असून त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी नार्वेकर आणि महापालिका आयुक्त शर्मा यांच्या सामंजस्य करार झाला.यावेळी खासदार विचारे, आमदार केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.


हेही वाचा – भोंगा कमळाला किती त्रास देतोय ते आगामी काळात समजेल, सुभाष देसाईंची बोचरी टीका