ममतांना नकार मात्र ठाकरेंचा चित्ररथ राजपथावर दिसणार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर १२ राज्यांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्राच्या चित्र रथाची बांधणी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. चित्ररथाचे काम देखील अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.

republic day 2022 central government allowed Maharashtra Chitrarath in parade Maharashtra Biodiversity theme
ममतांना नकार मात्र ठाकरेंचा चित्ररथ राजपथावर दिसणार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी

महाराष्ट्रचं वैभव पुन्हा एकदा दिल्लीतल राजपथावर दिसणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर सांस्कृतीक कार्यक्रम होत असतात. यावेळी सैन्याकडून आपले कौशल्य, कसब आणि थरारक स्टंट दाखवण्यात येतात. तर प्रत्येक राज्याच्या संस्कृतीच दर्शन होत असते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला सुरुवातीला परवानगी नाकारली होती अशा चर्चा होत्या परंतु आता केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालचा चित्ररथ केंद्राने नाकारला आहे परंतु महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी दिली असल्याचे समजते आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील संबंध फारसे चांगले नसल्यामुळे चित्ररथ नाकारण्यात आला का? अशी शंका उपस्थित होत आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर विविध राज्यांच्या चित्ररथाचे संचालन होत असते. या संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडूच्या चित्ररथाला मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे. १६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन होत असते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाकडून यंदा महाराष्ट्रातील जैवविविधतेवर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. सुरुवातीला पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारच्या चित्ररथांना सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली असल्याचे समजते आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर १२ राज्यांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्राच्या चित्र रथाची बांधणी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. चित्ररथाचे काम देखील अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.

चित्ररथावर दिसणार महाराष्ट्राची जैवविविधता

चित्ररथावर ब्लू मॉर्मॉन हे फुलपाखरु आहे. ८ फुटाचे पुलपाखरु असणार असून त्याचे पंख उघडझाप करणार आहे. महाराष्ट्राचे ताम्हण फूल आहे. कास पठार दाखवण्यात आले आहे. त्यातील विविध फूल आणि सरडा सुपरबा ही जात दाखवण्यात आले आहे. राज्य प्राणी शेखरुची प्रतिमा देखील दाखवण्यात आली आहे. हा प्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. राज्याचा पक्षी हरियाल त्याला पिवळं कबुतर म्हणतात ते दाखवण्यात आले आहे. वाघाला दाखवण्यात आले आहे. माळढोक पक्षी दाखवण्यात आला आहे. नव्याने सापडलेला खेकडा गुबर नटोरिया ठाकरियाना देखील दाखवण्यात आला आहे.


हेही वाचा : कोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, अजित पवारांचं भाकीत