देवेन भारतींसह महाराष्ट्रातील चौघांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर, राज्याला 74 पदकं

republic day 2023 Police medals for 901 personnel 140 for gallantry

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. याशिवाय राज्यातील 31 पोलिसांची पोलीस शौर्यपदक तर 39 पोलीस अधिकारी यांची पोलीस पदकासाठी निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली.

राज्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रपती पद जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्टाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. यासह नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर आणि परिक्षेत्रातील सुखदेव मुरकुटे यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झालं आहे. राज्यातील 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदाकाने सन्मानित केलं जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध राज्यातील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदक जाहीर झालं आहे. यातील 104 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पोलीस पदाने गौरवण्यात येईल, तर 93 पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 668 पोलीस कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित केलं जाईल.

पोलीस शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या 140 कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 80 पोलीस कर्मचारी हे प्रभाविक अतिरेकी क्षेत्रात कार्यरत आहेत. शौर्य पदक मिळवण्यात सीआरपीएफ अव्वल क्रमांकावर असून त्यांना 47 पदकं मिळाली आहेत. यात महाराष्ट्राला 31, जम्मू काश्मीर 25, झारखंड 9, दिल्ली, छत्तीसगड, बीएसएफच्या प्रत्येकी 7 जवान आणि उर्वरित इतर राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफ जवानांना हा पुरस्कार मिळाला आहे.

यासह 55 जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित केलं जाणार आहे. हे शौर्य पदक राष्ट्र सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवानांनी दाखवलेल्या शौर्यासाठी दिलं जात,. उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागीर संरक्षण पदक प्रदान केले जाते. 9 जवानांना हे पदक गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि 45 जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाणार आहे.


शिक्षकांचा खरा प्रतिनिधी विधान परिषदेत जावा म्हणून किरण पाटलांची निवड; फडणवीसांचं प्रतिपादन