घरताज्या घडामोडीप्रजासत्ताक दिन : 901 पोलिसांचा पोलीस पदक आणि 140 पोलिसांचा शौर्या करता...

प्रजासत्ताक दिन : 901 पोलिसांचा पोलीस पदक आणि 140 पोलिसांचा शौर्या करता पोलीस पदकाने सन्मान

Subscribe

दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना पोलीस पदका प्रदान करत सन्मानित केले जाते. यंदाही पोलिसांना पोलीस पदके देण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त 901 पोलिसांना पोलीस पदक प्रदान करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना पोलीस पदका प्रदान करत सन्मानित केले जाते. यंदाही पोलिसांना पोलीस पदके देण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त 901 पोलिसांना पोलीस पदक प्रदान करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 140 पोलिसांना शौर्या करता पोलीस पदके देण्यात आली आहेत. याशिवाय 93 पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी (PPM) राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 पोलिसांना गुणवंत सेवेसाठी (PM) प्रदान करण्यात आली आहेत. (Republic Day Total 901 Police Personnel Awarded For Police Medals)

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्या करीता पोलीस पदके देण्यात आली. त्यापैकी 80 पोलिसांना डावे प्रभावित क्षेत्रात सेवा केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, 45 पोलिसांना जम्मू-काश्मीरमध्ये सेवा केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यापैकी ४८ सीआरपीएफचे, तर ३१ महाराष्ट्र पोलिसांचे आहेत. याशिवाय 25 जम्मू-काश्मीरमधील, नऊ झारखंडमधील, सात दिल्ली पोलिसांचे आहेत. याशिवाय इतर राज्यांतील बीएसएफ आणि पोलीस आहेत.

- Advertisement -

11 हजार सैनिकांना मानद रँक देऊन गौरविण्यात आले

त्याशिवाय, प्रजासत्ताक दिनानिमित्त 11 हजारांहून अधिक लष्करी जवानांना मानद पदक प्रदान करण्यात आले. दरवर्षी सेवारत आणि निवृत्त कर्मचार्‍यांना सैन्यातील त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी सन्मानित रँक प्रदान केले जातात.

- Advertisement -

हेही वाचा – दीपक केसरकर म्हणतात आदित्य ठाकरे यांना अनुभव नाही; वाचा नेमके प्रकरण काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -