घरमहाराष्ट्रReservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून विमुक्त जातीच्या सर्व संघटना आक्रमक; रास्तारोको अन् वाहनांची...

Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून विमुक्त जातीच्या सर्व संघटना आक्रमक; रास्तारोको अन् वाहनांची तोडफोड

Subscribe

जळगाव : राज्यात एकीकडे ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणावरून आमनेसामने आले असताना आता विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील समाज सुध्दा रस्त्यावर उतरला आहे. विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी आज (6 फेब्रुवारी) गोर सेना व बंजारा समाज बांधव जळगाव जिल्ह्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जामनेर तालुक्यातील पहूर गावात गोर सेनेच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी जळगाव, छत्रपती संभाजीनगर व भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन केले आहे. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवरील वाहनांचीही तोडफोड केली.  (Reservation All organizations of free castes are aggressive on the issue of reservation Roadblocks and vandalism of vehicles)

हेही वाचा – Piyush Goyal : पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता; ‘या’ भाजपा आमदाराचा पत्ता होणार कट?

- Advertisement -

गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात माेठ्या संख्येने बंजारा समाजातील लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत व्यक्ती सहभागी झाले आहेत. यात महिलांही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. विमुक्त जातीचे खोटे जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच विविध मागण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत.

घाेषणाबाजी करत आंदोलनकर्ते पुढे सरकत असतानाच या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी भाजपाचे चिन्ह असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी दिली. आंदोलकांनी तब्बल अडीच ते तीन तास महामार्ग रोखून धरल्याने जळगाव, छत्रपती संभाजीनगर व बऱ्हाणपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : ठाकरे दाम्पत्याचा वंदे भारतने प्रवास आणि…

आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही

जोरदार घोषणाबाजी करताना संघटनांकडून राज्य सरकारसह मंत्र्यांचा तीव्र निषेधही नोंदवण्यात येत आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान आंदाेलकांची भूमिका लक्षात घेता जादा पाेलिस बंदाेबस्त घटनास्थळी मागविण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -