जिप अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; नाशिक, ठाणे व रायगड सर्वसाधारण तर, पालघर अनुसूचित जमाती

मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ठाणे व रायगड सर्वसाधारण तर, पालघर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. या आरक्षणाची यादी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण, प्रभाग रचनेतील बदल, राज्यात बदललेली राजकीय समीकरणे या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही हे आऱक्षण जाहीर झाल्याने लवकरच या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद आरक्षण पुढीलप्रमाणे –
ठाणे – सर्वसाधारण; पालघर – अनुसूचित जमाती; रायगड – सर्वसाधारण; रत्नागिरी -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला); सिंधुदुर्ग – सर्वसाधारण; नाशिक – सर्वसाधारण (महिला); धुळे – सर्वसाधारण (महिला); जळगाव – सर्वसाधारण; अहमदगर – अनुसूचित जमाती; पुणे – सर्वसाधारण; सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला); सांगली – सर्वसाधारण (महिला); सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग; कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला); औरंगाबाद – सर्वसाधारण; जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग; बीड – अनुसूचित जाती; परभणी – अनुसूचित जाती; हिंगोली – सर्वसाधारण (महिला); नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग; उस्मानाबाद – सर्वसाधारण (महिला); लातूर – सर्वसाधारण (महिला); अमरावती – सर्वसाधारण (महिला); अकोला – सर्वसाधारण (महिला); वाशिम – सर्वसाधारण; बुलडाणा – सर्वासाधारण; यवतमाळ – सर्वसाधारण; नागपूर – अनुसूचित जमाती; वर्धा – अनुसूचित जाती (महिला); भंडारा – अनुसूचित जमाती (महिला); गोंदिया – नागरिकांचा मागास प्रवर्ग; चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला); गडचिरोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला); नंदुरबार – अनुसूचित जमाती (महिला).