घरमहाराष्ट्रReservation: आमच्या आरक्षणावर डल्ला मारतोयस, ते थांबव आधी, उपकार होतील; भुजबळ जरांगेंवर...

Reservation: आमच्या आरक्षणावर डल्ला मारतोयस, ते थांबव आधी, उपकार होतील; भुजबळ जरांगेंवर संतापले

Subscribe

भुजबळांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत, आपला राग व्यक्त केला आहे. आमच्या आरक्षणावर डल्ला मारतोयस, ते थांबव आधी, उपकार होतील

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वॉर सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भुजबळांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत, आपला राग व्यक्त केला आहे. आमच्या आरक्षणावर डल्ला मारतोयस, ते थांबव आधी, उपकार होतील, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना सुनावलं आहे. (Reservation If you are tampering with our reservation please stop it first Chhagan Bhujbal was furious with Jarange Patil)

काय म्हणाले भुजबळ ?

मनोज जरांगे ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. तसंच ते म्हणाले की, मनोज जरांगे आमच्यात फूट पाडण्यासाठी काहीही वक्तव्ये करतो. कधी म्हणतो मी धनगरांची बाजू लढणार, तर कधी नाभिकांच्या बाजूने लढणार. परंतु, तू आणि तुझे सहकारी आमच्या आरक्षणावर डल्ला मारत आहेत, ते करणं आधी थांबवं. तू आमच्या आरक्षणावर डल्ला मारणं थांबवलंस, ओबीसी समाजातून आरक्षण घेण्यासाठी चालवलेला प्रयत्न थांबवलास तर तुझे आमच्यावर खूप उपकार होतील. तू तुझी मागणी मागे घे, तसं केल्यास ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल, असं भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

भुजबळांनी मागच्या आठवड्यात अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला. भुजबळांनी त्यावेळी कोल्हापूरमधील नाभिक समाजातील एका तरुणाबरोबर झालेल्या कथित घटनेचा उल्लेख करून नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. नाभिकांनी मराठ्यांच्या दाढ्या करू नये, केस कापू नये, असं आवाहन केलं होतं. भुजबळांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली. त्यानंतर भुजबळ यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणही दिलं.

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ अशी वक्तव्ये करत राहिले तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ते निवडून येणार नाहीत. यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत भुजबळ म्हणाले, त्या जरांगेला जाऊन सांगा, तू आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहा आणि निवडून येऊन दाखव. तू आधी नीट उभा राहा मग बोल, असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भुजबळ म्हणाले की, मी 25 वर्षे झाले, मुंबई महापालिकेत होतो. दोन वेळा मुंबईचा महापौर झालो आहे. तसंच दोन वेळा मुंबईतून आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यानंतर चार वेळा येवल्यातून आमदार म्हणून निवडून आलो. उगीच काहीही वक्तव्ये करू नको.

(हेही वाचा: Nilesh Rane On Jadhav : भास्कर जाधव यांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर; “जनतेने मला स्वीकारले नाही तरी…”)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -