घर महाराष्ट्र मराठा समाजाच्या आरक्षणचा ठराव करून केंद्राकडे पाठवावा; विजय वडेट्टीवारांची मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणचा ठराव करून केंद्राकडे पाठवावा; विजय वडेट्टीवारांची मागणी

Subscribe

मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव करून तो केंद्राकडे पाठवावा आणि या विशेष अधिवेशनात केंद्राकडून तो मंजूर करून घ्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यावेळी सरकारकडे केली आहे.

मुंबई: मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीचार्जवरून राज्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. यावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात जाऊन अनेक नेत्यांनी जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची भेटही घेतली. आता राज ठाकरे देखील त्यांच्या भेटीला गेले आहेत. तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाबाबत एक मागणी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव करून तो केंद्राकडे पाठवावा आणि या विशेष अधिवेशनात केंद्राकडून तो मंजूर करून घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली आहे. तसंच, या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तलाठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून वडेट्टीवार यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागणी सरकारकडे केली आहे.  (Reservation of Maratha community should be resolved and sent to the Centre Demand of Vijay Wadettiwar)

आता जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. त्या अधिवेशनात मराठा समाजाला 12,15 टक्के जितकं आरक्षण आहे ते वाढवून द्यावं आणि ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं. जे आता 27 टक्के आहे ते तर 40 पर्यंत आरक्षण नेलं तर त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, त्यात काहीही अडचण नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

सरकारने मराठा आंदोलकांवर जो काही लाठीचार्ज केला आहे. त्यावेळी जे काही गुन्हे दाखल झाले. ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत. तसंच या संपूर्ण प्रकरणात जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

तसंच, आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावून विधानसभेत एकमतानं मंजूर करून ते केंद्राकडे पाठवावं आणि तिथे जे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यात एक दिवसाची वाढ करून तिथून मंजूर करून घेऊन, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी भूमिका मी सरकारकडे मांडल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

भाजप आरक्षण देणार नाही

- Advertisement -

गिरीश महाजन यांनी मराठा क्रांती मोर्चाचे नेत्यांशी चर्चा केली. एक महिना द्या, असं त्यांनी म्हटलं होतं. आता यावर प्रतिक्रिया देताना, विजय वडेट्टीवार म्हणाले की, एक काय 5 महिने दिले तरी आरक्षण देणार नाहीत. भाजप तसं करू शकत नाही. कारण, 4 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरूपात काही गोष्टी सांगितल्या होत्या. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय होता. त्यात त्यांना पिढीजात कुणबी समाजाचा दाखला द्यायला सांगितलं, ते देणं शक्य नाही. त्यात अनेक टेक्निकल अडचणी आहेत. तर आता अशी आश्वासन न देता, एक ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

केंद्रात आणि राज्यात भाजपच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी एक विशेष अधिवेशन बोलावून हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून तो केंद्रात पाठवावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं वडेट्टीवार म्हणाले.

(हेही वाचा: जालन्यात जायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तोंड नाही; संजय राऊतांची टीका )

- Advertisment -