घरमहाराष्ट्रReservation : ...कुठे फेडाल हे पाप? 'हा' दावा करत अंजली दमानिया यांचे...

Reservation : …कुठे फेडाल हे पाप? ‘हा’ दावा करत अंजली दमानिया यांचे भाजपावर टीकास्त्र

Subscribe

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे.

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. या विरोधामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक चकमक संपूर्ण महाराष्ट्राने पाहात आहे. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा करणारे ट्वीट समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले आहे. यात अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांसह भाजपावर निशाणा साधला आहे. भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

“भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप”, असे ट्वीट करत अंजली दमानिया यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. यामुळे अंजली दमानिया यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

- Advertisement -

मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीनुसार त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, असा जीआर राज्य सरकारने काढला आहे. सरकारच्या जीआरला छगन भुजबळांनी विरोध केला आहे. यानंतर छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray On BJP :…ये बता कि काफिला क्यूँ लुटा? ठाकरेंचा शायराना अंदाजात भाजपला सवाल

मला कोणतीही ऑफर नाही; भुजबळ

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले. पण अंजली दमानिया यांना कुठून माहिती मिळाली यांची कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले, “मला कुठल्या पदाची हौस नाही. मी ओबीसींसाठी 35 वर्षापासून काम करत आहे. अंजली दमानिया यांना कुठून माहिती मिळाली आणि याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला कोणतेही प्रपोजल आलेले नाही. मी देशभर ओबीसींसाठी काम करत आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -