घरताज्या घडामोडीपाटलांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राजीनामा द्या; मुख्यमंत्री शिंदेंना राऊतांचा खोचक सल्ला

पाटलांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राजीनामा द्या; मुख्यमंत्री शिंदेंना राऊतांचा खोचक सल्ला

Subscribe

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून तुम्ही राजीनामा द्या’, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. तसेच, ‘तुम्ही आज जाहीर करा की भाजपाच्या सत्तेत सामील झालेलो आम्ही गुलाम आहोत’, असा खोचक सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी दिला. (Resign in protest of Patil statement sanjay Raut advice to cm eknath shinde vvp96)

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. “चंद्रकांत पाटील म्हणाले असले तरी, त्यांच्या तोंडून भाजपा म्हणत आहे. कारण त्यांना माहित आहे की, मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा गट काहीही बोलणार नाही. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून तुम्ही राजीनामा द्या. आणि तुमच्यात हिंमत नसेल तर, शिवसेना आणि हिंदुत्वाचे नाव घेण्याचे तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही आज जाहीर करा की भाजपाच्या सत्तेत सामील झालेलो आम्ही गुलाम आहोत”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“आयोध्याच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या घडामोडीत हिंदूत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला त्याग या देशाला माहितेय आणि त्याच त्यागातून भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे”, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी कांडानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले होते, त्यातील ते प्रमुख आरोपी होते. हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी भाजपला हल्लाबोल केला.

“इतक्या वर्षांनी बोलण्याची गरज काय होती. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते. हे सगळे पळपुटे आहेत. ही मुद्दाम बाळासाहेब आणि शिवसेनेवर केलेली चिखलफेक आहे. शिवसेनेचं आस्तित्व संपवण्यासाठी चाललेले हे खेळ आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गटातील आमदाराच्या चालकाला बाउन्सरने केली मारहाण, जाणून घ्या कारण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -