घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : ओबीसींच्या पहिल्या सभेआधीच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; भुजबळांचा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : ओबीसींच्या पहिल्या सभेआधीच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; भुजबळांचा गौप्यस्फोट

Subscribe

अहमदनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी 26 जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा मनोज जरांगे यांना दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र याला मंत्री अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसींकडून विरोध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच त्यांनी गौप्यस्फोट केला की, ओबीसीच्या पहिल्या सभेआधी मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (Resigned as minister before first meeting of OBC Secret explosion of Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Ulhasnagar shootout : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

- Advertisement -

मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदाच ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज अहमदनगरमध्ये पार पडत आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, मात्र त्यांना प्रश्न करायचा आहे. वाशीमध्ये तुम्ही जाहीर केले की, मी शपथ घेतली होती ती आज मी पूर्ण केली. अशावेळी मला प्रश्न पडतोय की, शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्व्हे कशाला? तपासणी करणारे लोक स्वत:हून माहिती भरत आहेत. सर्व खोटं खोटं सुरू आहे. मराठा समाजाला जर आरक्षण मिळाले तर हे सर्व कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत. 360 कोटी रुपये खर्च यासाठी करत आहात का? असे प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारले आहेत.

सर्वाेच्च न्यायालयाचे निकाल आरक्षण विरोधात

ओबीसींचे सर्व आरक्षण संपवून टाकले आहे, हे आता सर्वांच्या लक्षात येत नाही का? असा प्रश्न उपस्थित करत छगन भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल हे आरक्षण विरोधात आहेत. झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतले तर त्याला बाहेर काढले जाईल, असे निवाडे होत आहेत. त्यामुळे काय चालल आहे हे समजत नाही. ओबीसी समाज मोर्चात सामील होतो म्हणून मारहाण केली जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे, असे गंभीर आरोपही यावेळी छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Jarange Vs Bhujbal : तुझं वय झालं आहे, गप्प बस नाही तर टपकन…; जरांगेंकडून पुन्हा एकेरी उल्लेख

ओबीसीच्या पहिल्या सभेआधीच मंत्रीपदाचा राजीनामा

ओबीसींचा महाएल्गार सभेत गौप्यस्फोट करताना छगन भुजबळ म्हणाले की, सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला. मला विरोधी पक्ष, स्वपक्षातील आणि सरकारमधील सर्वांना सांगायचे आहे की, 17 नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. मात्र त्याआधीच मी 16 नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. अडीच महिने मी शांत राहिलो. याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितले. त्यामुळे मला लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे, असा ठाम विश्वास यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -