घरताज्या घडामोडीभाजपचं टार्गेट आता अजित पवार; परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

भाजपचं टार्गेट आता अजित पवार; परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

Subscribe

अजित पवार यांची परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशी करावी असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप सातत्याने सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे चौकशीची मागणी करत आहेत. दरम्यान, आता भाजपने आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवला आहे. अजित पवार यांची परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशी करावी असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

सचिन वाझेने केला वसुलीचा आरोप 

परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता याच प्रकरणात अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणीने केली आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -