Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश G20 शिखर परीषदेसाठी मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून मराठमोळ्या युवकाकडे जबाबदारी

G20 शिखर परीषदेसाठी मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून मराठमोळ्या युवकाकडे जबाबदारी

Subscribe

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीमध्ये G-20 शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले आहे. या बैठकीच्या थेट प्रक्षेपणा करण्याची जबाबादारी एका खासगी कंपनीला दिली असून या टीमचे प्रतिनिधित्व मराठमोळा तरुणाकडे दिली आहे. या शिखर परिषदेसाठी मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून प्रमोद दाभोळे यांची निवड करण्यात आली आहे. हा तरूण कागल तालुक्यातील कुरूकली या छोट्याशा खेडेगावातील प्रमोद बाळासो दाभोळे असे या मराठामोळ्या तरूणाचे नाव आहे.

भारतात होणाऱ्या G-20 परिषदेच्या प्रत्येक क्षणाचे साऱ्या जगाचे लक्ष लागेल आहे. यात परिषदेच्या प्रसार माध्यमांना परवानगी नसल्याने खासगी कंपनीकडे थेट प्रक्षेपण करण्याचे काम सोपविले आहे. या परिषदेचे प्रक्षेपण करण्याचे काम हे एका नामांकित कंपनीला दिले असून या कंपनीची एक टीम सर्व काम पाहत आहे. या टीमचे प्रतिनिधित्व प्रमोद दाभोळे करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – G20India2023 : G-20मध्ये ‘भारता’ ने वेधले सर्वांचे लक्ष, आफ्रिकन युनियनला मिळाले कायम सदस्यत्व

यापूर्वी प्रमोद दाभोळे यांनी 21 जानेवारी 2020 मध्ये विदेश मंत्रालयात ग्राफिक्स डिझायनर, टेक्निकल असिस्टंट आणि व्हिडीओ एडीटर काम केले होते. यावेळी प्रमोद दाभोळेंनी 2020 ते 2022 या कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा प्रमोद दाभोळे काम केले होते आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरांचे व्हिडीओ एडिटींग आणि लाईव्ह स्ट्रिमिंगचेही काम केले होते.

- Advertisement -

- Advertisment -