घरमहाराष्ट्रग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच..., चंद्रशेखर बावनकुळेंचा 'त्या' फोटोबद्दल खुलासा

ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच…, चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘त्या’ फोटोबद्दल खुलासा

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट करत, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे ट्वीट टॅग केले आहे. हा फोटो भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही, असा पलटवार भाजपाने त्याबाबत केला आहे. तर, आपण सहकुटुंब मकाऊला असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय…, संजय राऊत यांच्या कथित फोटोला भाजपाचे प्रत्युत्तर

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यातील व्यक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी दिसते. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊमध्ये साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्यूत खेळले तर बिघडले कोठे? अशी कॅप्शन देतानाच, ‘फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तर, महाराष्ट्र भाजपाने ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही, असा पलटवार भाजपाने केला आहे. आम्हाला फक्त संजय राऊत यांनी सांगावे, आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे? असा सवालही केला आहे.

आता खुद्द बावनकुळे यांनीच ट्वीट करत खुलासा केला आहे. मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -