घरताज्या घडामोडीमहापालिकेच्या ऍक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयातील रोमन कॅथोलिक चर्चचा जीर्णोद्धार

महापालिकेच्या ऍक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयातील रोमन कॅथोलिक चर्चचा जीर्णोद्धार

Subscribe

मुंबई: ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्ताने मुंबई महापालिकेने एक अनोखी भेट उपलब्ध केली आहे. महापालिकेच्या वडाळा स्थित ऍक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय परिसरातील रोमन कॅथोलिक चर्चचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. नाताळचे औचित्य साधून हे चर्च रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना खुले करण्यात आले आहे.

ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण २५ डिसेंबर रोजी आहे. मात्र नाताळ सण मुंबईकर आणि देशभरात ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे थर्टी फर्स्टपर्यंत साजरा करण्यात येतो. या नाताळ निमित्ताने ख्रिस्ती वसाहतीमध्ये गजबज असते.

- Advertisement -

थर्टी फर्स्टला तर बहुतेक सर्व थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आणि थंड हवेच्या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर, पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याच नाताळ सणाच्या निमित्ताने मुंबई महापालिकेने वडाळा स्थित ऍक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय परिसरातील रोमन कॅथोलिक चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले आहे.

वडाळा येथील महापालिकेचे कुष्ठरोग रुग्णालयाला १३२ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. या रुग्णालयातील मंदिर, मस्जिद, चर्च, विपश्यना केंद्र, संग्रहालय आणि प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचा बंगला या वास्तुंना पुरातन वारसा-२चा दर्जा बहाल करण्यात आला आहे. नाताळ सणाच्या निमित्ताने पालिकेने सदर रुग्णालयातील पुरातन चर्चचा जीर्णोद्धार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आसनगाव स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -