घरताज्या घडामोडीगर्दी केल्यास पुन्हा निर्बंध

गर्दी केल्यास पुन्हा निर्बंध

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा : शुक्रवारी घेणार आढावा

जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होताच शहर तसेच उपगनगरांतील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहर तसेच जिल्ह्यातील एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला असता ही गर्दी कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे जर गर्दीचा महापूर कायम राहिला, तर पुन्हा निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये निर्बंध शिथिल करतांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतरही दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. परंतू निर्बंध शिथिल होताच पहिल्याच दिवशी शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील रस्ते नागरिकांच्या तुडुंब गर्दीने वाहत होते. काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही गर्दी धडकी भरवणारी होती. या परिस्थितीबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पहिल्याच दिवशी नाशिक शहरातील नागरिकांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोठी गर्दी केली. नागरिकांचा प्रतिसाद पाहून बहुतेक शुक्रवार पर्यंतच अनलॉक सुरू राहील असे वाटत असल्याचे ते म्हणले. कारण जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 200 रुग्णांचा फरक असल्याची धक्कादायक माहिती मांढरे यांनी दिली. जर नाशिककरांना पुन्हा लॉकडाऊन नको असेल, तर त्यांनी विनाकारण गर्दी टाळावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. जर अशीच गर्दी दररोज होत राहिली तर नाईलाजाने नाशिक लॉकडाऊनची वेळ ओढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -