घरमहाराष्ट्रपुण्यात आजपासून निर्बंध शिथील; हॉटेल्सही उघडणार

पुण्यात आजपासून निर्बंध शिथील; हॉटेल्सही उघडणार

Subscribe

कोरोना संसर्गाचं प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्याने पुणेकरांना मिळाला दिलासा

पुण्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्याने आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या पुरेशी असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार सोमवारी 14 जूनपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉक करण्यात आले आहे. पुणेकरांनाही नव्या नियमावलीत मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात सोमवारपासून सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. तसेच हॉटेल्सही सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख घसरत असला तरी म्युकरमायकोसीसचा धोका कमी झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -