घरमहाराष्ट्रMLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार, 'या' नेत्याचा...

MLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार, ‘या’ नेत्याचा दावा

Subscribe

आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा एका मोठ्या नेत्याकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्याचाच विजय होणार असल्याचे सांगितले आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या काही दिवसांत आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या इतर 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेच्या कारवाईवरील सुनावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीला उशीर होत असल्याने या प्रकरणी ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु, या सर्व प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा एका मोठ्या नेत्याकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्याचाच विजय होणार असल्याचे सांगितले आहे. (result of MLA disqualification will be in favor of the Thackeray group, claims big’ leader)

हेही वाचा – Ashwini Bindre massacre : खटला चालविण्यास सरकारी वकिलाचा नकार; बिंद्रेंच्या पतीकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, 16 आमदारांच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. आमची सत्याची बाजू आहे. उद्धव ठाकरे एकदम संयमी नेते आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा विजय झालाच पाहिजे. त्यांचा विजय होईल, असे मी म्हणत नाही, तर त्यांचा विजय झालाच पाहिजे, असे मी म्हणत आहे. कारण होईल म्हटले की, तुम्हाला कसे माहीत? असे विचारले जाईल.

तसेच, मी धार्मिक माणूस आहे. मी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पूजा करतो. त्यामुळे मला माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल. या निकालाविषयी आम्ही जेव्हा उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध न्यायाधीश व सर्व तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो, त्यातून हे 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचा निष्कर्ष येतो. त्यामुळे ते 100 टक्के अपात्र होतील. त्यांच्या मित्र पक्षाचे काही लोकही हाच दावा करत आहेत. असे घडले तर महाराष्ट्रात खूप मोठा भूकंप होऊ शकतो, असेही चंद्रकांत खैरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घ्यायला लावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मागील महिन्यात झालेल्या यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने टिप्पणी केली की, आम्ही डेडलाईन दिली नसली तरी विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करावा असा त्याचा अर्थ नाही. या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय? असा प्रश्न करून किती वेळेत काम करणार याचे टाइमटेबल द्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -