घरदेश-विदेशAssembly Election Result 2022 : आज 5 राज्यांचा निकाल

Assembly Election Result 2022 : आज 5 राज्यांचा निकाल

Subscribe

मिनी लोकसभेचा कौल कुणाला याचा होणार फैसला

मिनी लोकसभा म्हणून संबोधल्या जाणार्‍या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर अशा 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालाची प्रतीक्षा आज गुरुवारी संपणार आहे. 10 मार्चला सकाळी 8 वाजेपासून या पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली असून स्ट्राँगरूममध्ये बंदिस्त असलेल्या ईव्हिएम मशीनच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकेल, तसतशी उमेदवारांची धडधड वाढणार आहे.

निकाल जाहीर होण्याआधीच काही एक्झिट पोल्सनी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलेल असा अंदाज वर्तवला आहे. तर, गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तापदासाठी चुरशीची लढत आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता एक्झिट पोल्सने वर्तवली आहे. हे अंदाज किती खरे ठरतात आणि या रणसंग्रामात नेमकी बाजी कोण मारणार, हे सायंकाळी मतमोजणीची प्रक्रिया संपल्यावरच कळेल.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा असून येथे बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि येथे बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ आहे. तर, गोव्यात विधानसभेच्या एकूण जागा ४० आहेत आणि बहुमताचा आकडा २१ आहे. दुसरीकडे, मणिपूरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ६० आहे आणि बहुमताचा आकडा ३१ आहे.

ईव्हिएमसोबत छेडछाड केल्याचा आरोप
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईव्हिएमसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. ईव्हिएम स्ट्राँगरूममध्ये नेताना प्रोटोकॉलचे पालन झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यावर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने दिला आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्व स्ट्राँगरूमबाहेर सुरक्षा तैनात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -