पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, इथे पहा निकाल

Results of departmental pre-examination for the post of Sub-Inspector of Police announced

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 16 एप्रिल 2022ला ही परीक्षा झाली होती. MPSCकडून या परीक्षेचा निकाल https://mpsc.gov.in जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी आयोगाने दिलेल्या कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाला प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

परीक्षेचा निकाल मोबाईलवर –

मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर आयोगाकडून एसएमएस द्वारे निकाल कळवला जाईल, अशी माहिती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल –

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पदासाठीची मुख्य परीक्षा आयोगाने 3 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता या तारखेत बलद करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेची सुधारीत तारीख प्रसिद्धीपत्रक आणि आयोगच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.