घरअर्थजगतदिलासादायक! किरकोळ महागाईचा दर वर्षभरात निचांकीवर

दिलासादायक! किरकोळ महागाईचा दर वर्षभरात निचांकीवर

Subscribe

वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर निचांकीवर आला आहे. त्यानुसार, महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली दिसला असून, सलग दुसरा महिन्यात महागाईचा दर निचांकावर आहे.

वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर निचांकीवर आला आहे. त्यानुसार, महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली दिसला असून, सलग दुसरा महिन्यात महागाईचा दर निचांकावर आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर एका वर्षातील नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. (Retail Inflation Hits Record Low 5.72 Percent In December Third Straight Month Of Decline)

सरकारच्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाई दर 5.72 टक्के दिसला आहे, तर नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 5.88 टक्के होता. विशेष म्हणजे डिसेंबर हा सलग दुसरा महिना आहे. जेथे किरकोळ महागाई RBI च्या 4 (+/- 2) टक्क्यांच्या टॉलरेंस बँडच्या जवळ आला आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्याच्या महागाईत घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थांचा महागाई दर 4.19 टक्क्यांवर आला, जो नोव्हेंबर 2022 मध्ये 4.67 टक्के होता. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 7.01 टक्के होता. त्याचवेळी, डिसेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईत घट झाली आहे.

ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांची महागाई डिसेंबर महिन्यात 5.05 टक्के आहे, जी नोव्हेंबरमध्ये 5.22 टक्के होती. तर शहरी भागात अन्नधान्य महागाईचा दर 2.80 टक्के आहे, जी नोव्हेंबरमध्ये 3.69 टक्के होती.

- Advertisement -

पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर 15.08 टक्क्यांवर आला आहे. तर फळांच्या भाववाढीचा दर दोन टक्के राहिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.51 टक्के, अंड्यांचा महागाई दर 6.91 टक्के आणि मसाल्यांच्या महागाईचा दर 20.35 टक्के राहिला.

दरम्यान, RBI ने 2 ते 6 टक्के महागाई दराचा टॉलेरन्स बँड निश्चित केला आहे. परंतु ऑक्टोबर 2022 पर्यंत, किरकोळ महागाई दर आरबीआयच्या टॉलेरन्स बँडच्या पलीकडे राहिला.


हेही वाचा – नाशिकमधील पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार? भाजपा पाठिंबा देण्यास तयार, पण…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -