समुद्राकडून मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट, किनाऱ्यावर साचला प्लास्टिकचा ढीग

माहिम समुद्रकिनाऱ्यावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये समुद्रातील प्लास्टिकचा कचरा किनाऱ्यावर आल्याचं दिसतंय.

plastic garbage on the seashore

राज्यात एकीकडे पावसाने जोर धरला असून समुद्रालाही उधाण आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रात फेकलेल्या प्लास्टिकचा कचरा (Plastic Garbage) पुन्हा समुद्राने रिटर्न केला आहे. माहिम समुद्रकिनाऱ्यावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये समुद्रातील प्लास्टिकचा कचरा किनाऱ्यावर आल्याचं दिसतंय. (Return Gift from Arabian sea, plastic garbage on the seashore)

हेही वाचा शक्तिमान बनायला गेला अन् कचऱ्याच्या गाडीत पडला, व्हिडीओ व्हायरल

१ जुलैपासून भारतात प्लास्टिक बंदी (Plastic Banned in India) लागू करण्यात आली आहे. सिंगल युज प्लास्टिकवर (Signle Use Plastic) बंदी आणली असली तरीही अनेकजण प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करतात. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. मात्र, तरीही अनेक बाजारपेठांमध्ये, दुकानात ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांची मागणी केली जाते. प्लास्टिक पिशव्यांचं विघटन होत नसल्याने शासनाकडून यावर बंदी घालण्यात आलीय. मात्र,तरीही लोकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. तसेच या प्लास्टिक पिशव्या वापरून झाल्यावर इतरस्त्र फेकल्या जातात. समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्या समुद्रात फेकल्या जातात. परिणामी भरतीच्या वेळी, समुद्र खवळलेला असताना उंच लाटांच्या माध्यमातून समुद्रातील प्लास्टिकचा कचरा पुन्हा किनाऱ्यावर येऊन धडकतो. म्हणजेच, समुद्राला आपण जे देतो, तेच आपल्याला रिटर्न गिफ्ट मिळतं.


Mumbaimatterz नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर झाला असून अनेकांनी तो व्हायरल केला आहे. या व्हिडिओत असणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यात सर्वाधिक प्लास्टिक आणि थर्माकॉलच्या वस्तू आहेत. चप्पलही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील कचरा गटारांमधून समुद्रात फेकला जाणार नाही, यासाठी योग्य यंत्रणा राबवल्या पाहिजेत, अशी नेटीझन्सने मागणी केली आहे.

हेही वाचा – मुंबई आणि ठाणेकरांसाठी निर्णयांचा पाऊस

दरम्यान, हा व्हिडिओ मुंबई पालिकेपर्यंतही पोहोचला. त्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन समुद्र किनारा स्वच्छ केला आहे. त्यांनी आधीचा आणि नंतरचा फोटो ट्विट करत स्वच्छता मोहिमेविषयी माहिती दिली.