घरताज्या घडामोडीरेल्वे आरक्षण तिकिटांचा परतावा सहा टप्प्यात

रेल्वे आरक्षण तिकिटांचा परतावा सहा टप्प्यात

Subscribe

नाशिकरोड : प्रवाशांनी आरक्षित केलेल्या रेल्वे तिकिटांचे पैसे परतावा मिळवतांना प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून सहा टप्प्यांत पैसे देण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवासाचे आरक्षण केले होते. मात्र, कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. याकाळात प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटाचे पैसे परतावा मिळण्यासाठीही अडचणी आल्या होत्या, रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून प्रवासाच्या तारखांचे सहा टप्पे करण्यात आले असून तिकिट आरक्षण कार्यालयात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.

आरक्षण कालावधी : पैशांचा परतावा

२२ ते ३१ मार्च  : २६ मेपासून
१ ते १४ एप्रिल  :  १ जूनपासून
१५ ते ३० एप्रिल : ७ जूनपासून
१ ते १५ मे        :  १४ जूनपासून
१६ ते ३१ मे     :  २१ जूनपासून
१ ते ३० जून     : २८ जूनपासून
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -