घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र शासनात २ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त, RTI मधून खुलासा

महाराष्ट्र शासनात २ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त, RTI मधून खुलासा

Subscribe

मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

महाराष्ट्र शासनाचे शासकीय कर्मचारी तसेच जिल्हापरिषद अंतर्गत आज समितीस २ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे. एकूण २९ विभाग आहेत असून या रिक्त पदात १६ असे विभाग आहेत ज्याची माहिती अद्ययावत नाही. अनिल गलगली यांच्या मते मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शासनाने रिक्त पदे लवकरात लवकर भरावी,अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे १८ जून २०२१ रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक ३१ डिसेंबर २०१९ यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या १०, ९९,१०४ इतकी आहे. ज्यापैकी ८,९८,९११ ही पदे भरलेली आहेत. तर २,००,१९३ ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची १५३२३१ तर जिल्हापरिषदेच्या ४०९४४ अशी एकूण २००१९३ पदे रिक्त आहेत. एकूण २९ विभागापैकी १६ विभागाची दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची माहिती उपलब्ध आहे.

- Advertisement -

एकूण २९ विभागापैकी १६ विभागाची दिनांक ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची माहिती उपलब्ध आहे. यात गृह विभागाची चार खाती, महसूल व वन विभागाची तीन खाती, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, सामाजिक व न्याय विभाग, नगरविकास विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग, गृहनिर्माण विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -