घरमहाराष्ट्रसंभाजी भिडेंनी चंद्रकांत पाटलांची घेतली खासगीत भेट!

संभाजी भिडेंनी चंद्रकांत पाटलांची घेतली खासगीत भेट!

Subscribe

कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी वादात सापडलेले शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गुरुवारी सकाळीच राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात भेट घेतली. चंद्रकात पाटील यांच्या निवासस्थानीच ही भेट झाल्यामुळे राज्यभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या १ जानेवारीला कोरेगाव-भिमा हिंसाचाराला १ वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अजून देखील या प्रकरणातील आरोपींना कायद्याच्या बडग्याखाली आणण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या भेटीच नक्की झालं काय? याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, भेटीत काय झालं? याविषयी चंद्रकांत पाटील किंवा संभाजी भिडे यांच्याकडून काहीही सांगितलं जात नसल्यामुळे या चर्चेला अधिकच हवा मिळत आहे.

भेटीचं कारण काय?

दरम्यान, या भेटीमध्ये नक्की काय झालं? याची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, कोरेगाव-भिमाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. बुधवारी संध्याकाळीच ही भेट ठरली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट शक्य होऊ शकली नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळीच संभाजी भिडे चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधल्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी या दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. या चर्चविषयी दोघांकडून अजूनपर्यंत मौन पाळण्यात आलं आहे. मात्र, हे दोघेही चर्चेवेळी एकटे होते अशी माहिती मिळत आहे.

- Advertisement -

ही बातमी वाचलीत का? – भिडे गुरुजी घाबरले अटक टाळण्यासाठी वकिलांची पळापळ

का आहेत संभाजी भिडे वादात?

१ जानेवारी २०१८ला पुण्याजवळच्या कोरेगाव-भिमा या ठिकाणी मराठा बांधव आणि दलित बांधव यांच्यामध्ये झालेल्या वादाचं दंगलीत रुपांतर झालं होतं. या वादात मराठा समाज बांधवांच्या भावना भडकवण्याचा आरोप संभाजी भिडेंवर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -