Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'त्या' रुग्णालये,नर्सिंग होम, प्रसूतीगृहांचे परवाने, प्रमाणपत्र रद्द करा -भाजप

‘त्या’ रुग्णालये,नर्सिंग होम, प्रसूतीगृहांचे परवाने, प्रमाणपत्र रद्द करा -भाजप

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील आगीप्रसंगी तेथील सनराईज रुग्णालयातील ९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना नुकतीच घडली आहे. यातून बोध घेऊन पालिकेने आता सर्व मॉल्स, रुग्णालये, प्रसुतीगृहे, नर्सिंग होम आदी ठिकाणी फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Story

- Advertisement -

अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास येईल, अशा रुग्णालये प्रसुतीगृहे, नर्सिंग होम यांचे परवाने, नोंदणीकृत प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात यावीत, अशी मागणी भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील एक पत्र भाजपतर्फे महापौर पेडणेकर यांना देण्यात आले आहे. त्यावर पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, ज्योती आठवणी, उज्वला मोडक आणि विनोद मिश्रा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील आगीप्रसंगी तेथील सनराईज रुग्णालयातील ९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना नुकतीच घडली आहे. यातून बोध घेऊन पालिकेने आता सर्व मॉल्स, रुग्णालये, प्रसुतीगृहे, नर्सिंग होम आदी ठिकाणी फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास येईल, अशा रुग्णालये प्रसुतीगृहे, नर्सिंग होम यांचे परवाने, नोंदणीकृत प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात यावीत. तसेच, मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३६ (ह) अन्वये महानगरपालिकेची तातडीची सभा त्वरित बोलविण्यात यावी, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे.

भांडुप (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ड्रीम्स मॉलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील रुग्णालये, नर्सिंग होम, प्रसूतिगृह, मॉल, इत्यादी आस्थापनांमधील रुग्ण सुरक्षा व अग्निसुरक्षा ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर ड्रीम्स मॉल व सनराईज रुग्णालयात अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यरत नव्हती. आग लागल्यास अग्निशमनासाठी वॉटर हायड्रंट गंजलेल्या व नादुरुस्त अवस्थेत होते, असे समजते. तसेच रुग्णालय असलेल्या या ड्रीम्स मॉल अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले तर नाहीच. शिवाय रुग्णालय या उद्दिष्टासाठी वापरातही बदल केलेले नाहीत. असे असतानाही मात्र महापालिकेने या सनराइज रुग्णालयात महाराष्ट्र नर्सिंग होम अॅक्ट नुसार नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसतानादेखील अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे समजते, असे भाजपने सदर पत्रात म्हटले आहे.


- Advertisement -

हे ही वाचा- गोरेगावच्या भीषण आगीत सात दुकानं जळून खाक

- Advertisement -