Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बापरे! बंडखोर आमदारांचा हॉटेलमधील खर्च 'इतका'; वाचून व्हाल थक्क

बापरे! बंडखोर आमदारांचा हॉटेलमधील खर्च ‘इतका’; वाचून व्हाल थक्क

Subscribe

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंड पुकारला आहे. बंडाळी पुकारलेले आमदार हे सध्या आसामच्या गुवाहटीतील हॉटेल रॅडिसन बीएलयू या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंड पुकारला आहे. बंडाळी पुकारलेले आमदार हे सध्या आसामच्या गुवाहटीतील हॉटेल रॅडिसन बीएलयू या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. मात्र, हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांचा मुक्कामाचा आणि खाण्याचा अंदाजित खर्च दररोज ८ लाख रुपये लाख असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधील ७० खोल्या सात आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये ७ दिवस राहण्याचा आणि खाण्याचा खर्च सुमारे ५६ लाख रुपये असेल. (Revolt MLA of shiv sena Radisson BLU hotel expenses 56 lakh for 7 days)

बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी गुवाहाटीतील आलिशान हॉटेलच्या बाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलवर आज तृणमूल काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी भाजपविरोधी घोषणा दिल्या.

- Advertisement -

या बंडाबाबत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये “गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) इतर पक्षांना फायदा झाला तर शिवसेनेला तोटा. जिथे इतर पक्ष मजबूत झाले, तिथे शिवसेनेची ताकद मात्र कमी झाली.” पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक युतीतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितासाठी हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ‘ऑपरेशन कमल’ सुरु आहे.

सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारीही तैनात

- Advertisement -

त्याशिवाय, बंडखोर आमदारांच्या गटाला गुवाहाटीतील आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. या हॉटेलमध्ये सध्या सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. गुवाहाटी पोलिसांनी हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे.

नजिकच्या जलुकबारी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांसह, राखीव बटालियन आणि आसाम पोलिसांच्या कमांडो युनिट्सचे डझनभर कर्मचारी हॉटेलवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हॉटेल लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे १५ किमी अंतरावर आहे.


हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, आमदारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -