Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग 'रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली...आणि होत्याचं नव्हतं झालं'

‘रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली…आणि होत्याचं नव्हतं झालं’

Subscribe

भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार घडला. गावात मस्करी करणं तरूणांच्या जिवावर बेतलं आहे. रिव्हॉल्व्हरची गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. दस्तगीर जिलानी पटेल (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली.

बाबा शेख यांच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून दस्तगीर जिलानी पटेल याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता बाबा शेख दस्तगीरच्या घराच मित्रांसोबत बसला होता. तिथेच त्याने जेवणही केले. त्या दोघांनी मद्यप्राशनही केले. त्यांनतर सगळे गप्पामारत बसले. या दरम्यान बाबा शेख यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर दस्तगीर हा न्याहळत होता. त्यांच्या मस्करीही सुरू होती. याचवेळी दस्तगीकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून गोळी सुटली. गोळी दस्तगीरलाच लागली.

- Advertisement -

गोळी लागताच दस्तगीरला तातडीने उपचारासाठी बार्शी येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भूमचे पोलिस निरीक्षक सहायक पोलिस निरीक्षक यांनी पाटसांगवी गावी पोहोचले. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा नोंदवण्यात आला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -