घरमहाराष्ट्रअजित पवार, हसन मुश्रीफांसह ६५ संचालकांना क्लिन चीट

अजित पवार, हसन मुश्रीफांसह ६५ संचालकांना क्लिन चीट

Subscribe

राज्य सहकारी बँक घोटाळा

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चीट देण्यात आली आहे. यावर अजित पवार यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला. सोबतच मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेला आरोपांवरही अजित पवार बोलले आहेत.

हसन मुश्रीफ म्हणाले की, मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांत पाटील यांनी माझे नाव घातले. चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर “ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी उगळण चांगले नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सहकारी बँक ही सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक आहे. शिखर बँक थेट शेतकर्‍यांच्या पैशावर नियंत्रण ठेवते. स्थापनेपासून आजपर्यंत या बँकेवर शेतकर्‍याची मुलच संचालक होती. पण त्यांनीच कोणतंही तारण न घेता साखर कारखाने, सूतगिरण्यांसारख्या अनेक लघुउद्योगांना नियमबाह्य कर्ज वाटली. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने 24 कारखान्यांना कोणतेही कारण न घेता कर्ज देण्याचा पराक्रम केला.

कर्ज थकलं म्हणून सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीला मंजुरी देण्यात आली आणि नेत्यांनीच हे कारखाने खरेदी केले. दोन्ही व्यवहारात मिळून बँकेचं 420 कोटीचं नुकसान झालं. संचालकांनी लघुउद्योगांना स्थावर मालमत्ता गहाण, तारण न घेता कर्ज दिलं. त्यामुळे बँकेचे थेट 32 कोटी बुडाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -