घरदेश-विदेशमुंबई-पुणे हायपरलूप संदर्भात रिचर्ड ब्रॅन्सन मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मुंबई-पुणे हायपरलूप संदर्भात रिचर्ड ब्रॅन्सन मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Subscribe

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पातील शंका दूर करण्यासाठी रिचर्ड ब्रॅन्सन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

जुलै २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबई-पुणे हायपरलूपला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून सरकारने मान्यता दिली होती. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत फेरविचार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या प्रकल्प स्थगित होण्याची चिन्ह दिसतं आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा ब्रिटीश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी असं सांगितलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि १० अब्ज डॉलर्स असलेला मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाबद्दल नवं सरकार कसं पाऊल उचणार आहे हे जाणून घेण्यासाठी भेट घेणार आहे.

या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च खासगी क्षेत्राकडून करण्यात येणार असून राज्यातील कोणत्याही निधीवर ही प्रकल्प अवलंबून नसल्याचे ब्रॅन्सन यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांच्यासमवेत या प्रकल्पाबद्दल शंका दूर करण्यासाठी ही भेट होणार असल्याचे ब्रॅन्सन यांनी पत्रकारांना सांगितले. या भेटी दरम्यान या प्रकल्पाची माहिती देणार आहेत. तसंच या प्रकल्पाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांचीही उत्तर आपल्या परिने देऊन हा प्रकल्प स्थगित होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- Advertisement -

हायपरलूप ग्रुप येथील इंजिनिअर लास वेगास मध्ये प्रकल्पातबाबत काम करत आहेत. ते लवकरच मुंबई-पुणे प्रकल्पातमध्ये काम करणार असल्याचे ब्रॅन्सन यांनी सांगितलं.

टेस्ला इंक बॉस एलोन मस्क यांच्या मूळतः संकल्पित केलेल्या तंत्रज्ञानास हायपलूर असं नावं दिलं गेलं आहे. लोकांना जलद गतीने प्रवास करण्यासाठी व्हॅक्यूमचा उपयोग केला जातो.  या तंत्रज्ञानावर अनेक कंपन्या काम करत आहेत.

- Advertisement -

हायपरलूप या प्रकल्पाची घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना केली होती. तसंच हा प्रकल्प २०२० मध्ये सुरू करण्याचे आश्वासन दिलं होत. त्यावेळेस फडणवीस सरकारने या प्रकल्पाला पायाभूत सुविधांचा दर्जा देऊन या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी कमी करून २३ मिनिटांवर होणार असल्याचे सांगितलं होतं.

एअर इंडिया खरेदी करण्यात मला इच्छा नाही, असं ब्रॅन्सन म्हणाले. तसंच जेट एअरवेज बंद पडल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि म्हणाली की, एअरलाइन्स उद्योगात येणे सोपे नसते.


हेही वाचा – Citizenship Amendment Bill: आसामच्या अनेक भागात इंटरनेट बंद! तणाव वाढला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -