घरCORONA UPDATELockDown: रिक्षाचालकाच्या कार्याला सलाम; लग्नाच्या निधीतून केली मजुरांची मदत

LockDown: रिक्षाचालकाच्या कार्याला सलाम; लग्नाच्या निधीतून केली मजुरांची मदत

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपापल्या परीने लोकांना, गरजूंना, स्थलांतरीतांना मदत केल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यातील अक्षय कोठावळे या तरुणानेही मजुरांसाठी मदतीचा हात पुढे करत लॉकडाऊनच्या काळात इतरांसाठी एक आदर्श निर्माण करून दिला आहे. अक्षयने त्याच्या लग्नाकरता साठवलेल्या पैशातून अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ मजुरांना वाटप केले. विशेष म्हणजे अक्षय हा एक रिक्षाचालक असूनही त्याच्यापरीने त्याने जमेल तेवढी मदत गरजूंना केली आहे. अक्षयच्या कार्याची माहिती मिळताच त्याला देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. अक्षयला आतापर्यंत ६ लाख रुपयांचा निधी देशभरातून मिळाला आहे. तसेच त्याने मजुरांना साधारण ३०० राशन किटचे वाटप आतापर्यंत केल्याचे सांगितले जात आहे. मदत करण्याची वृत्ती असल्यास आपला बँक बॅलन्स किती आहे हे पाहण्याची गरज नसते. कोणत्याही आर्थिक स्तरातील व्यक्ती मदत करू शकतो, हे अक्षय कोठावळेने त्याच्या कार्यातून दाखवून दिले आहे.

गरजूंना मदत करण्याची भावना 

लोकांनी अक्षयच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे टाकण्यास सुरूवात केली. आपल्या कार्यासाठी लोकं इतका भरभरून प्रतिसाद देतील, असे स्वप्नातही वाटले नव्हती, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली. अनोळखी माणसांनी आपल्यावर टाकलेला हा विश्वास सार्थकी लावू, असेही त्याने म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिसादामुळे आपण भारावून गेलो आहोत. आपल्याला काम करण्याची आणखी ऊर्जा मिळाली आहे, असे अक्षयने नमूद केले. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळातच अक्षयने आपल्या वडिलांना गमावले असून त्यांच्या दुःखातून सावरण्यासाठी लोकांना मदत करण्याची भावना आपल्याला बळ देत असल्याचे अक्षय सांगतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे. त्यामुळे गरजूंना मदत करून त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अक्षय म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ द्या; शाहांचं ममतांना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -