घरताज्या घडामोडीमहिलेला पाहून विकृत रिक्षा चालकाचे हस्तमैथुन

महिलेला पाहून विकृत रिक्षा चालकाचे हस्तमैथुन

Subscribe

महिलेने पहिल्यांदा दुर्लक्ष केले, मात्र रिक्षाचालक वारंवार किळसवाणा प्रकार करत राहिला.

पिंपरी-चिंचवडमध्ये ३४ वर्षीय महिलेला पाहून विकृत रिक्षा चालकाने हस्तमैथून केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने सांगवी पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्यांदा महिलेने या घटनेकडे दुर्लक्ष केले. परंतु, संबंधित विकृत रिक्षा चालकाने दुसऱ्या दिवशी पुन्हा महिलेला पाहून हस्तमैथुन केले. घटने प्रकरणी आरोपी रिक्षा चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे किळसवाणा प्रकार घडला आहे. ३४ वर्षीय महिला रात्री नऊच्या सुमारास पतीसह दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पती हे शेजारील दुसऱ्या दुकानात दूध आणण्यासाठी गेले. तेव्हा ३४ वर्षीय फिर्यादी या पाव खरेदी करून दुकानाच्या बाहेर येत असताना त्यांच्याकडे पाहून अनोळखी विकृत रिक्षा चालक हा हस्तमैथुन करत असल्याचे दिसले. फिर्यादी यांनी पती ला बोलावण्याचा प्रयत्न केला असता तोपर्यंत विकृत रिक्षा चालक पळून गेला. फिर्यादी यांनी या गोष्ठीकडे दुर्लक्ष केले.

- Advertisement -

परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी एक च्या सुमारास असाच किळसवाणा प्रकार घडला. फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी या कॉफी शॉपवर गप्प मारत थांबल्या होत्या. तेव्हा विकृत रिक्षा चालक आला त्याने फिर्यादी यांना अश्लील हावभाव करत इशारे केले आणि त्यांच्याकडे पाहून हस्तमैथून करू लागला. संबंधित रिक्षा चालकाचा रिक्षा क्रमांक घेऊन फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात फिर्याद दिली आहे. विकृत रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. एम.एच-१२ क्यू.आर-१४७१ क्रमांकाची रिक्षा कोणाला दिसल्यास सांगवी पोलीस ठाण्याच्या संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -