घर क्राइम ठाण्यात भरदिवसा मुलीचा विनयभंग, सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

ठाण्यात भरदिवसा मुलीचा विनयभंग, सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

Subscribe

ठाणे स्टेशन रोड परिसरात महिलेच्या विनयभंगाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडा करत असलेल्या तरुणाला विरोध केल्याने मुजोर रिक्षाचालकाने तरुणीला चक्क रिक्षासह फरफटत नेल्याची घटना ठाण्यात घडली. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ठाणे स्टेशन रोड परिसरात महिलेच्या विनयभंगाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडा करत असलेल्या तरुणाला विरोध केल्याने मुजोर रिक्षाचालकाने तरुणीला चक्क रिक्षासह फरफटत नेल्याची घटना ठाण्यात घडली. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रिक्षा चालकाने फरफटत नेल्याने तरुणी जखमी झाल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर रिक्षा चालकाने तेथूळ पळ काढला. याप्रकरणी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली असून, पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. (rickshaw driver molesting a young woman in Thane caught in CCTV)

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सकाळी कॉलेजला जात होती. त्यावेळी एका रिक्षा चालकाने त्या तरुणीचा विनयभंग केल्याचे समजते. तरुणी कॉलेजला जात असताना रिक्षाचालक तिथे आला आणि त्याने तरुणीला इशारे करत तिची छेडछाड काढली.

त्यानंतर तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला तरुणीने पकडण्याचा प्रयत्न केला. रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करत तरुणीला फरफटत नेले.

- Advertisement -

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर रिक्षा चालकाविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे नगर पोलीसांनी अखेर या आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून त्याची अधिक चौकशी करत आहेत.


हेही वाचा – अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?; ‘सामना’तून शिंदे गटाला सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -